Saturday, June 11, 2016

सरल updates

*Latest Update...*

------------------------------------------
*Student portal होणार पुन्हा सुरू*
------------------------------------------

मित्रांनो तयार व्हा पुन्हा एकदा
सरलच्या कामासाठी....🙏🏻

   दि. १०/०६/२०१६ ला
   झालेल्या VC मध्ये  
च   खालीलप्रमाणे सुचना        
         प्राप्त झाल्या आहेत.
     
        *Student Portal -*
🔺 पुढील आठवडयात            स्टुडंट पोर्टल सुरु केले जाईल.
🔺 सध्या पुणे विभागासाठी
  लॉगीन उपलब्ध करुन देण्यात
  आले आहे.
🔺 २ कोटी २४ लक्ष विदयार्थ्यां
   पैकी २ कोटी २० लक्ष ३९     
         हजार विदयार्थ्याचा डाटा गोळा
         झाला आहे.
🔺यापैकी ४७% विदयार्थ्यांचा डाटा मॅच झाला आहे.
🔺 *१ ते ८ चे सर्व विदयार्थी RTE अन्वये पात्र झाल्याचे गृहीत धरून त्या सर्व विदयार्थ्यांना प्रमोट करण्याचा शासनाचा निर्णय*
🔺 *वर्ग ९,१० व ११ च्या विदयार्थ्याना ऑनलाईन पुढील वर्गात प्रमोशन दयावे लागतील.*
🔺 *पुढील वर्षात सर्व चाचण्यांचा निकाल ऑनलाइन घ्यावा लागेल.*
🔺student portel च्या अधिक विस्तृत्व माहितीसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण पुणे येथे होणार.
- जिल्हयातुन २ व्यक्ती (१- प्राथ, व १- माध्य)
- या २ तंज्ञामार्फत तालुक्यातील ५ लोकांना प्रशिक्षण दिले जाईल.
- तालुक्यातील ५ तंज्ञामार्फत सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल.

*Student Portel वर सध्या प्रामुख्याने ऑनलाइन टि.सी. ट्रान्सफर  चे काम करायचे आहे.*

त्यासाठी खालील काही महत्वाच्या सुचना VC मध्ये देण्यात आल्या...

*student.maharashatra.gov.in*
      यावर लॉगीन करावे.

🔹 पासवर्ड चेंन्ज करावा.
🔹यासाठी मु.अ. ची DOB (जन्मतारीख) महत्वाची आहे.
🔹साईड वर माहितीकरीता मराठी व इंग्रजी भाषेमध्ये मेन्यूअल दिले आहे. त्यात संपूर्ण माहिती विस्तृत्वपणे दिली आहे.
🔹 ऑनलाइन टि.सी. ट्रान्सफर साठी *Request - Conform - Update*  या तीन पातळीवर आधारीत ही प्रक्रिया असणार आहे.

▶ *Request -*
🔹 *विदयार्थी ज्या शाळेत गेला असेल त्या (विदयार्थ्याची नवीन शाळा) शाळेच्या मु.अ. ने Request Form भरावा.*
- Request Form भरण्यासाठी विदयार्थ्याच्या जुन्या शाळेचा U- DISE कोड, वर्ग, जन्म तारीख टाकून सर्च केल्यानंतर वर्गानुसार विदयार्थी यादी उपलब्ध होईल.
- ज्या विदयार्थ्याचा दाखला हवा असेल त्या विदयार्थ्याच्या नावासमोर असलेल्या चेकबॉक्स वर क्लीक ☑ करावे.
- त्यानंतर तसा SMS जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाला जाणार आहे.

▶ *Conform -*

🔹 *ज्या शाळेतून दाखला दयायचा आहे (विदयार्थ्याची जुनी शाळा) त्या शाळेच्या मु.अ. नी Request Confirmation करायची आहे. यासाठी Transfer Conformation Option निवडावा*

▶ *Update -*

🔹Request Confirmation नंतर नवीन शाळेच्या मु.अ. नी सदर विदयार्थी माहिती अपडेट करायची आहे.
- जसे वर्ग, तुकडी, जनरल रजिष्टर क्रमांक अपडेट करुन घ्यावे.

🔵 *महत्वाच्या बाबी -*

▪ एका विदयार्थ्यासाठी एकच Request दर्ज होईल.
▪Request पाच ते सात दिवसात Conform न केल्यास ती BEO लॉगीन ला जाईल.
▪BEO कडून ती Conform करावी लागेल.
▪ चुकीने टाकल्या गेलेली Request BEO लॉगीन वरून Reject करावी लागेल.
▪ *विदयार्थ्याला मिळालेला ID त्याच्या शालेय जीवणापर्यंत कधीही बदलला जाणार नाही. त्याची शाळा बदलली तरीही.. !*
▪ बाहेरील राज्यातून आलेल्या विद्यार्थ्याची डेटा एन्ट्री नवीन करावी लागेल.
▪ *ज्या विद्यार्थ्याचे नाव Online Transfer प्रोसेसमध्ये दिसत नाही अशा विदयार्थ्यांचे Online Transfer नविन डेटा एन्ट्री लॉगीन उपलब्ध झाल्यावर करता येईल.*
▪ *ऑनलाइन माहिती मध्ये एका पेक्षा जास्त वेळा दर्ज झालेला विदयार्थी (Duplicate) डिलीट करण्यासाठी नंतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामूळे Online Transfer च्या वेळी अशा प्रकारचा विदयार्थी असेल तर सदर विदयार्थ्याची कोणतीही एक माहिती निवडून Transfer करावा.*
▪ Online Transfer सोबत शाळेकडून दिला जाणारा दाखला देखील महत्वाचा आहे.

Friday, June 10, 2016

शाळेत विद्यार्थ्यांची जातवार माहिती संकलित करण्यासाठी नेहमी उपयोग होईल

आठवणीतील गीत स्कुल चले हम.....


सवेरे सवेरे यारो से मिलने बन ठन के निकले हम

भीमराव रामजी आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
येवल्याला भाषण देताना बाबासाहेब आंबेडकर
जन्मतारीख:एप्रिल १४, इ.स. १८९१
महापरिनिर्वाण:डिसेंबर ६, इ.स. १९५६
भारतीय घटनेचे शिल्पकार [१]
जन्मस्थान:महू, मध्य प्रदेश
राष्ट्रीयत्व:भारतीय
धर्म:बौद्ध
पत्‍नीरमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
अपत्ये:यशवंत भीमराव आंबेडकर
आई:भिमाई रामजी आंबेडकर
वडील:रामजी मालोजी आंबेडकर
आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू,मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. [२].[३]./[४]भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

शिवाजी महाराज


 Picture









ओळख 

                    मराठी साम्राज्याचे संस्थापक
 आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधेअनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरचीआदिलशाही, अहमदनगरची निजामशाहीमुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. आणि बलाढ्य 



   जन्म 
                     शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ,शिवनेरी जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी१६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरीकिल्ल्यावर
झाला.




   शहाजीराजे 
                          शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधीलतंजावरला आपले राज्य स्थापन केले.



   जिजाबाई
                         जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारीदादोजी कोंडदेव[ संदर्भ हवा ] ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्यासिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.




    मार्गदर्शक
                                     लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते.

Thursday, June 9, 2016

सुवीचार संग्रह

* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!

* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!
* एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.
* भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.
* समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून जावू द्या!
* कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.
* अपयश कायम नसते. यश सुद्धा!
* मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते.
* चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र
* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.
* स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?
* "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे.
* लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.
* प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.
* एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?
* कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!
* शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो. आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.
* काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.
* यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.
* वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.
* मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.
* आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.
* ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!